गुलाबाचे फुल दिसायला ताजे,
हळदी कुंकवा दिवशी
….चे नाव घेते,
सौभाग्य माझे..
जीवन म्हणजे,
सुख दुःखाचा खेळ,
…..रावांचे नाव घेतेे,
हळदीकुंकवाची वेळ…
गौरीपुढे ठेवल्या फुलांच्या राशी,
…..रावांच नाव घेते हळदीकुंकवाच्या दिवशी..
नीलमणी आकाशात,
चंद्राची प्रभा,
_______ रावांच्या नावामुळे,
कुंकवाची शोभा..
मावळला सूर्य,
चंद्र उगवला आकाशी,
_______ रावांचे नाव घेते,
हळदी कुंकवाच्या दिवशी..
वडिलांची माया
आणि आईची कुशी,
_____रावांचे नाव घेते,
हळदी कुंकूंच्या दिवशी..
गळ्यात मंगळसूत्र,
हि पतिव्रतेची खून,
_____ रावांचे नाव घेते,
_____ ची सून..
जास्वदांच्या फुलांचा हार,
गणपती बाप्पाच्या गळ्यात,
_______ रावांचे नाव घेते,
स्त्रियांच्या मेळ्यात..
हिरव्या हिरव्या रानात,
चरत होते हरण,
______ रावांचे नाव घेते,
हळदी कुंकाचे कारण..
हळदी कुंकूला आल्या,
साऱ्या महिला नटून,
______ रावांनी आणलेली साडी दिसते,
सर्वात उठून…
हळदी कुंकूला भेटतात,
महिलांना गिफ्ट,
_______ रावांनी दिली होती मला,
लग्नाच्या आधी बाईकवर लिफ्ट..
फुलांनी सजवले,
हळदी कुंकवाचे ताट,
_____ रावांमुळे मिळाली,
माझ्या आयुष्याला वाट..
गोकुळ झालं दंग,
पाहून श्रीकृष्णाचे खेळ,
______ रावांचे नाव घेते,
आज आहे हळदी कुंकवाची वेळ..
कान भरण्यात,
बायका आहेत हौशी,
_____ रावांच नाव घेते,
हळदी कुंकूंच्या दिवशी.
हळदी कुंकू आहे,
सौभाग्याची शान,
_____ रावांना आहे,
सोसायटी मध्ये खूप मान.
हळदी कुंकूसाठी,
जमल्या साऱ्या बायका,
_______रावांचे नाव घेते,
सर्वांनी ऐका…
संसाररूपी करंजीत,
प्रेमरूपी सारण..
…..रावांचे नाव घेते,
आज आहे हळदी कुंकवाचे कारण..
कपाळावर कुंकू,
हिरवा चुडा हाती..
……राव माझे पती,
सांगा माझे भाग्य किती..
गुलाबाचे फुल दिसायला ताजे,
हळदी कुंकवा दिवशी…चे नाव घेते,
सौभाग्य माझे..🙏🙏
कपाळाचं कुंकु,
जसा चांदण्यांचा ठसा..
… चे नाव घेते,
सार्या जणी बसा..
श्री कृष्णाच्या खोड्या पाहून,
गोकुळ झालं दंग..
…..रावांच्या प्रेमामुळेच चढला,
माझ्या मेहंदीला गडद लाल रंग..
संक्रांतीच्या सणाला असतो
तिळगुळाचा मान..
…….रावांच्या जीवावर देते
हळदीकुंकाचं वाण..
सासर आणि माहेरचे सगळेच आहे हौशी,
……रावांचे नाव घेते हळदी कुंकूवाच्या दिवशी..
मकर संक्रांतीच्या निमित्ताने
हळदी कुंकूवाचा घातला घााट..
आमच्या ….. रावांचा आहे
एकदम राजेशाही थाट..
गणपतीला आवडतात दुर्वा,
कृष्णाला आवडते तुळशी..
……रावांच नाव घेते,
हळदी कुंकवाच्या दिवशी..
कुंकू लावते लाल, त्यात पडला मोती,
राव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती..
निळ्या निळ्या आकाशात उगवला शशी,
….. रावांचे नाव घेते,
हळदीकुंकूवाच्या दिवशी..
हळद असते पिवळी,
कुंकू असते लाल,
___रावांची मिळाली साथ,
झाले जीवन खूशहाल..