ओठांवर हसू आणि गालांवर खळी,
आमच्याकडे उमलली आहे छोटीशी कळी,
तिच्या बारश्यासाठी सर्वांनी यायचं हं.
दिनांक –
वेळ –
स्थळ –
निमंत्रक –
इटुकले पिटुकले माझे हात,
इवले इवले माझे गाल,
गोड गोड किती छान,
सर्वांची मी छकुली लहान
पण माझे नाव काय.?
अहो … तेच तर ठरवायचे आहे..
म्हणून आपणा सर्वांना आग्रहाचे आमंत्रण..
माझ्या बारशाला यायचं हं…
दिनांक –
वेळ –
स्थळ –
निमंत्रक –
आईबाबांनी माझं बारसं करायचं ठरवलं आहे..
मला आर्शिवाद आणि प्रेम देण्यासाठी
सर्वांना आग्रहाचे आमंत्रण..
मी सर्वांची वाट पाहीन…
पण जास्त उशीर नाही करायचं हं.
नाहीतर मी झोपून जाईन..
याल तर गोड गोड पप्पी,
नाही आला तर मात्र कट्टी..
दिनांक –
वेळ –
स्थळ –
एक नाजुकसं स्वप्न प्रत्यक्षात अवतरलं,
आकाशाचं चांदणं जणू ओंजळीत येऊन निजलं,
इवलंसं चिमणं बाळ साऱ्यांना हसवायला लागलंं,
बघता बघता त्याचं बारसं करायचं ठरलं,
इवल्याशा पंखांना फक्त आर्शिवादाचं बळ हवंं,
त्यासाठी मात्र तुम्ही सर्वांना घरी यायलाच हवं..
दिनांक –
वेळ –
पत्ता –
गणेशासारखी बुद्धी
आणि हनुमानासारखी भक्ती
बाळाला आमच्या मिळावी,
तुमच्या आर्शिवाद ची शक्ती यासाठी
आपणास बारशाचे आग्रहाचे निमंत्रण..
अहो आजी, आजोबा, काका, काकू,
मामा, मामी,आत्या, मावशी, दादा, ताई
मी तीन महिन्याचा झालो,
पण तुम्ही अजून मला माझं नाव दिलं नाही…
म्हणूनच माझ्या मम्मी पप्पांनी तुम्हाला
माझ्या बारश्याला बोलावलं आहे.
चला तर मग लागा तयारीला…
या द्यायला मला छान छान नाव
आणि खूप खूप आर्शीवाद..
पहिली बेटी धनाची पेटी,
परमेश्वराने भरली सुखाने ओटी..
कन्यारत्नाला आमच्या तुमचेही आर्शिवाद हवे,
तिला नाव द्यायचे आहे नवे..
तेव्हा सर्वांनी बारशाला यायलाच हवे..
वर्षानुवर्षे ज्याची आस होती,
ते स्वप्न आज पूर्ण झालं..
बाळाच्या आगमनाने
घराच्या आमच्या गोकूळ झालं..
गोकुळातल्या या कृष्ण कन्हैयाला
नाव आता द्यायचं आहे..
बाळाच्या बारशासाठी
आमंत्रण तुम्हाला खास आहे..
बीजमधूनी अंकुर फुटले,
किलबिल किलबिल सूर उमटले,
कुशीत प्रीतीचे फुल फुलले,
सुखी संसारी बाळ जन्मले..
दुडूदुडू धावतो बाळ, शोभा आली अंगणा..
बाळकृष्ण भासतो चिमुकला पाहुणा,
घरादारांत सुखाचं त्यानं चांदणं शिंपलं,
माझं सोनुलं सोनुलं , माझं छकुलं छकुलं,
बाळा स्वप्नात तुला दोन्ही डोळ्यांनी जपलं..
आमच्या छकुल्याच्या बारशासाठी सर्वांनी यायचं हं..
दिनांक –
स्थळ –
निमंत्रक –
आई-बाबा म्हणतात,
लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात…
मग अशा या गोंडस फुलाला
आर्शीवाद द्यायला तुम्ही येणार ना.?
मी वाट पाहतोय माझ्या बारश्याच्या दिवशी..
आमच्या आयुष्यातील खास दिवस…
आमच्या छकुल्याचा नामकरण दिवस…
या शुभ दिवशी आपणां सर्वांचे आर्शिवाद
आणि शुभेच्छा आम्हाला हव्या आहेत…
मग येताय ना बाळाच्या बारशाला
देवरायाकडे आहे अमुल्य ठेवा,
त्याने दिला आम्हाला आयुष्यभराचा दुवा,
गोंडस बाळाच्या आगमनाने प्रसन्न झाले घर,
त्याला आर्शीवाद द्यायला यावे मात्र तत्पर..
कोणी म्हणतं चिऊ, कोणी म्हणतं दिदी..
अहो असं किती दिवस चालायचं…
म्हणूनच आम्ही आमच्या बाळाच्या
नामकरण विधीचं आयोजन केलं आहे…
तरी आपण सर्वांनी या सोहळ्यास
आवर्जून हजर राहावे ही विनंती..
बाळाच्या आगमनाची
गोड बातमी आली कानी..
आई बाबा म्हणून घेताना
नात्याची वीण घट्ट झाली..
आमच्या परीला नाव व आर्शिवाद द्यायला
हवे तुम्ही सारे जण
आणि वेळेवर या मात्र पटकन…
सांगा सांगा माझे नाव,
कोण सांगेल माझे नाव..
माझं नाव काय हे जाणून घ्यायचं असेल तर
….तारखेला ….या वेळेत
माझ्या नामकरण विधीला अवश्य या…
कोण म्हणतं छकुली,कोण म्हणतं गोंडोली..
पुरे झाली टोपण नावं,
मी आता मोठी झाली..
आई बाबांना मी सांगितलं आहे,
मला माझं नाव हवं..
पण त्यासाठी माझ्या बारश्याला
तुम्ही सर्वांनी यायला हवं..
आमच्या छकुल्याचा नामकरण सोहळा
आपणा सर्वांना आग्रहाचे निमंत्रण..
जन्मले मी नूतन बालक तान्हुले,
माझ्या मातापित्याचे मी सोनुले,
जन्म घेतला मातेच्या उदरी,
आनंद देण्यासाठी आलो या भूतलावरी,
स्वकीय आणि आप्तेष्टांच्या आर्शिवादाने
नतमस्तक होईन माझ्या माता पित्या चरणी,
पण अजून झाली नाही ओळख तुमची आणि माझी
अहो म्हणूनच आमंत्रण तुम्हा सर्वांना
ओळख करून द्यावया माझी..
या द्यावया आर्शिवाद आणि ठेवा सुंदरसे माझे नाव..
नामकरण संस्कार ‘आनंदाची वार्ता’
परमेश्वर कृपेने आम्हांस कन्यारत्न प्राप्त झाले आहे.
तरी हा आनंद बारशाचे निमित्ताने आम्ही द्विगुणित करण्याचे नियोजित केले आहे.
नामकरण विधी….ठिकाणी…. या वेळेत पार पडणार आहे.
तरी या प्रसंगी आपण आमच्या छकुलीला आपले शुर्भाशिर्वाद देण्यास यावे ही विनंती..🙏
आपणांस आणि आपल्या परिवारास आग्रहाचे निमंत्रण..
आपणा सर्वांच्या आर्शिवादाने
आमच्या घरी पुत्ररत्न प्राप्त झाले आहे,
तरी आपण सर्वांनी आमच्या बाळाच्या
बारशासाठी सहकुटुंब यावे ही विनंती..
क्षणात हसणं, क्षणात रडणं, इकडून तिकडे फिरताना अलगत पडणं, सहज खेळता खेळता मुळूमुळू रडणं आणि ऋतुमानाप्रमाणे सारं काही सतत बदलत राहणं,अशाच दुडदुडणाऱ्या पावलांचं आगमन आमच्या घरी झालं आहे..
त्याच्या मागे पावलावर पाऊल ठेवत घरभर पळायचं आहे, पण त्याआधी त्याला छानसं नाव ठेवायचं आहे…
तेव्हा तुमच्या सर्वांना आमच्या बाळाच्या बारशाचं आग्रहाचं आमंत्रण..
दिनांक –
वेळ –
स्थळ –
निमंत्रक –