मला आमच्या घरी येऊन एक महिना झाला.
माझ्या आईवडिलांना हा क्षण साठवून ठेवायचा आहे..
त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि
माझ्या नामकरण विधीसाठी सर्वांनी यायचं हं..
पत्ता:____________________
दिनांक_____आणि वेळ____
निमंत्रक:________

आमच्या लाडक्या कन्येच्या
नामकरणाचा विधी दिनांक… सायंकाळी… वा.
करण्याचे योजले आहे.
तरी आपण सहपरिवार येऊन
आमच्या कन्येला आर्शिवाद आणि
शुभेच्छा द्याव्या ही नम्र विनंती..

इटुकले पिटुकले माझे हात,
इवले इवले माझे गाल,
गोड गोड किती छान,
सर्वांची मी छकुली लहान,
आज माझा नामकरण सोहळा.

कृष्णाचा यशोदेला लागला ध्यास,
तसाच होता आम्हालाही विश्वास…
परमेश्वराची झाली कृपा
आणि तो झाला आमचा श्वास..
आमच्या छकुल्याच्या नामकरणासाठी
तुम्हाला आमंत्रण आहे खास..
दिनांक:______
वेळ:______
स्थळ:_____
निमंत्रक:_________

आम्ही आमच्या मुलाच्या
नामकरण सोहळ्यासाठी
एक लहान सोहळा आयोजित करीत आहोत,
या सोहळ्यास तुम्हाला आमंत्रित केले आहे..!

आमच्या लाडक्या मुलीचा नामकरण सोहळा,
म्हणून आम्ही एक लहान पार्टी आयोजित करत आहोत.
या आनंददायी प्रसंगी आपण यावे ही विनंती !

आमच्या छोट्या मुलीच्या नामकरण सोहळ्यात
आम्ही आपल्या उपस्थितीची विनंती करतो,
या आणि आमच्या मुलीला आशीर्वाद द्या! धन्यवद

मी आणि आमच्या कुटुंबाकडून
तुम्हाला आाग्रहाचे आमंत्रण…
आमच्या घरी एक छानशी परी अवतरली आहे.
तिला नाव देण्यासाठी आणि तिला आर्शिवाद
देण्यासाठी सर्वांनी यायचं हं..

आमच्या आयुष्यातील
एका खास दिवसाचा आनंद
सामायिक करण्यासाठी
आम्ही मनापासून आमंत्रित करतो.
कारण पुढच्या आठवड्यात
आमच्या मुलीचे नाव ठेवले जाईल.
तर,कृपया उत्सवात या..!

आम्ही आमच्या घरी आमच्या मुलाचा
नामकरण सोहळा होणार आहोत,
आम्ही आमच्या परिवारासह आपल्याला
या समारंभात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करतो !

माझे बाबा …. व आई …
मग माझे नाव काय?
आहो तेच ठरवायचं आहे…!
माझी आजी – आजोबा, काका,
मावशी, आत्या, मामा-मामी, ताई,
दादा, सर्वच येणार आहेत.
मग आपण ही यायचं हां…!
