बाबाची लाडकी लेक गोडूंली,
मोठी झाली सासरी चालली…
कसा जगू आता मी तान्हुल्या,
बाबाची लाडकी लेक गोडूंली..!
बाबाला शब्दात मांडायला
माझा बाबा एव्हढा छोटा नाही…
आणि बाबाला शब्दात
मांडावं एव्हढी मोठी मी नाही…!
मुलीचा बाप आहे तो,
नशीबवान पंगतीतला
भाग्यवान तो…!!
खास मुलींबाबत एक प्रेमळ सत्य..
या जगात कोणतीही मुलगी ही,
तिच्या नवर्यासाठी त्याची “राणी”
नसेल ही कदाचित.. पण..??
तिच्या वडिलांसाठी ती,
नेहमीच एक सुंदर “परी” असतेच…
सोड सारी चिंता
आनंदात रहा बाळा..
तुला रडताना पाहून
तुझ्या बाबाचा
लागत नाही डोळा..!
हे जग आहे तीव्र ऊन
पण ती तर फक्त सावली आहे..
प्रेमाने सजलेली, ममतेने भरलेली
आई तर फक्त आईच आहे..!”
संघर्ष हा वडिलांकडून आणि
संस्कार हे आईकडून शिकावे.
बाकी सगळं दुनिया शिकवते..!!
बाबा म्हणजे कष्ट करणारं शरीर,
काळजी करणारं मन…!
स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून
मुलींसाठी झटणारं अंत:करण…!!
शर्यत लागली होती जगातील
आनंदाला एका शब्दात लिहिण्याची,
ते पुस्तके शोधत बसले आणि मी
आईबाबा लिहून आले..!!
मी नसेल आई दिवा वंशाचा,
मी आहे दिव्यातील वात,
नाव चालवेन कुळाचे आई बाबा,
मोठी होऊनी जगात..!
लेकीची पसंती कळताच
आई-बाबाचं काळीज धडधडतं..
चिमुकली घरटं सोडून जाणार
म्हणून आतल्या आत बिचारं रडतं..!
“आईला विसरु नका,
आई घराचं मांगल्य असते,
तर बाप घराचं
अस्तित्व असतो…!!
“आयुष्यात दोन व्यक्तींची
खूप काळजी घ्या.
तुम्ही जिंकण्यासाठी स्वत:
आयुष्यभर हरत राहिले ते बाबा..
तुमच्या हरण्याला सतत जिंकणं
मानत आली ती आई…!!
“आयुष्याच्या लढाईत
बाबा नावाची तलवार आणि
आई नावाची ढाल सोबत असली की,
संघर्षाला सहज हरवता येते…
“आयुष्यात काही नसले तरी चालेल,
पण आई-वडिलांचा हात
नेहमी पाठीशी असावा…
चारचौघात आई बापाची मान
खाली झुकू नये असं लेकीने जगावं,
आणि आई वडिलांना कुणापुढे हात
पसरायची वेळ येऊ नये असं मुलाने जगावं..
“आई लेकराची माय असते,
वासराची गाय असते,
दुधाची साय असते,
लंगड्याचा पाय असते,
धरणीची ठाय असते,
आई असते जन्माची शिदोरी,
सरतही नाही उरतही नाही..
“घर सुटतं पण आठवन कधीच सुटत नाही,
जीवनात ”आई” नावाचं पान कधीच मिटत नाही,
सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात,
शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात…
“दुखाचा डोंगर कोसळलेला असो,
की सुखाचा वर्षाव होत असो,
मनाला चिंतेचे ग्रहण लागलेले असो,
की आठवणीचे तारे लुक लुकत असो,
आठवते फक्त आई..
“आई म्हणजे असते एक माये चा पाझर,
आई ची माया असते एक आनंदाचा सागर..
“जीवन हेच शेत तर आई म्हणजे विहीर,
जीवन हिच नौका तर आई म्हणजे तीर,
जीवन हिच शाळा तर आई म्हणजे पाटी,
जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी…
“स्वत:चे डोळे मिटेपर्यंत
जी प्रेम करते तिला आई म्हणतात,
पण डोळ्यात प्रेम न दाखवता
जो प्रेम करतो त्याला बाप म्हणतात..
“आई घराचं मांगल्य असते,
तर बाप घराचं अस्तित्व असतो,
आईकडे अश्रुचे पाट असतात,
बापाकडे संयमाचे घाट असतात,
ज्योतीपेक्षा समई जास्त तापते,
ठेच लागली की आईची आठवण येते,
मोठ मोठी वादळे पेलवताना बाप आठवतो,
मुलीच्या स्थळासाठी उंबरठे
झिजवणारा बाप असतो…
“डोळे मिटुन प्रेम करते ती प्रेयसी,
डोळे मिटल्यासारखे प्रेम करतेती दोस्ती,
डोळे वटारुण प्रेम करतेती पत्नी, आणि
डोळे मिटेपर्यंत प्रेम करतेती फक्त आई…
“आयुष्यात तुम्ही कितीही शिकलात
पैसा आणि नाव कितीही कमवलत,
तरीही आई वडील गुरू यांच्या
आशीर्वादाशिवाय सर्वकाही व्यर्थ असतं..
“संध्याकाळच्या जेवणची
चिंता करते ती “आई” आणि
आयुष्याभराच्या जेवणाची चिंता
करतात ते “बाबा”…
” देशातील प्रत्येक घर हे शाळा आहे आणि
घरातील माता-पिता हे शिक्षक आहेत…
“कोणाचं ATM CARD बनण्यापेक्षा
आई-वडिलांचा AADHAR CAR
बनायला जास्त आवडेल मला…
“नात्याचीं दोरी नाजुक असते
डोळ्यातील भाव ही ह्रदयाची भाषा असते,
जेव्हा जेव्हा विचारतो भक्ती व प्रेमाचा अर्थ
तेंव्हा एक बोट आईकडे तर
दुसरे बोट बाबाकडे असते..
“न थकता, न हरता, कधी न कंटाळता,
न थांबता कसलाही मोबदला न घेता,
आपल्याला घडवण्यात महत्वाचा
हक्क कोणाचा असेल,
तर तो आपल्या आई वडिलांचा..
“या जगात आई बाप सोडले ना
तर आपली कदर कोणालाच नसते,
हे मरेपर्यंत विसरू नका…
“आई-वडिलांसाठी
कोणतीही गोष्ट सोडा पण,
कोणत्याही गोष्टीसाठी
आई-वडिलांना सोडू नका…
“आईने बनवलं, बाबानी घडवलं,
आईने शब्दांची ओळख करुन दिली,
बाबानी शब्दांचा अर्थ समजवला.
आईने विचार दिले, बाबानी स्वातंत्र्य दिले,
आईने भक्ती शिकवली, बाबानी वृत्ती शिकवली,
आईने लढण्यासठी शक्ती दिली,
बाबानी जिकण्यासाठी नीती दिली,
त्यांच्या परिश्रमामुळे यश माझ्या हाती आहे….
“जिथे आपल्या आई बाबांना इज्जत नाही,
तिकडे आपण वाकुन सुद्धा बघत नाही..
“हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण,
आपल्या हजारो चुकाना क्षमा करणारे
आई वडील पुन्हा मिळणार नाहीत…
“जगाच्या बाजारात सर्व काही मिळेल,
पण आईची माया आणि वडिलांचं प्रेम
कितीही पैसे खर्च केले तरी मिळणार नाही..
“यशाच्या आकाशात गरूड
होऊन जेव्हा आपण भरारी मारत असू,
पृथ्वीवर दोन आतूर डोळे जग विसरून
पहात असतील,
ते दोन डोळे म्हणजे आपले आई-वडील..