फुटली नवी पालवी
आला नवा बहर,
आमच्या आयुष्यात आली आहे
एक गोडशी परी,
तुमच्या आशिर्वादाची आहे गरज..
आतुरतेने पाहत होतो ज्या क्षणाची वाट,
अवतरली आहे आज ती पहाट,
घरी आली लक्ष्मी,सुख, समृद्धी आणि
समाधानाच्या आल्या लहरी..
ओठांवर हसू गालावर खळी,
आमच्याकडे उमलली आहे छोटीसी कळी..
इवल्याशा पणतीने घर होते प्रकाशित,
आमच्या बाळाच्या येण्याने
आमचे जीवन झाले उल्हासित..
देवा तुझे आभार मानू किती
आमच्या गोकुळात एकच कमी होती!
आज______परिवारात लावली एक पणती..!
माझ्या आयुष्यातलं सुख तू ,
माझा आनंद तू ,
माझ्या सुखाची व्याख्या तू ,
माझा अंश आणि सारांश तू….!
आणि आज आमच्या घरात
एका गोड चिमुकलीच्या रूपाने
लक्ष्मीचा प्रवेश झालेला आहे…
माझ्या हृदयावर राज्य करणारी
अशी गोड परी आली आहे…
कन्यारत्न प्राप्त झाले.
बाबा झालो त्यातल्या त्यात मुलगी
झाल्याचा आनंद जास्त सुखावून गेला…
होय कन्यारत्न❣️😘*
आयुष्यात लेकीचा बाप झाल्याच्या
आनंदाने जे हृदय भरून येतं ते,
कुठल्याच सुखाच्या मापात मोजता येणार नाही…
प्रत्येक पित्याच एक रत्न असते,
ते म्हणजे रत्नात रत्न कन्यारत्न…
परमेश्वराची एक अनमोल देणगी…
जी आज मला मिळाली..
बाबा बोलले बाप होशील तेव्हा कळेल,
बाप तर आज झालो,
पण कळणार कधी त्याची वाट आहे.
आज आनंदाचा दिवस आमच्या
____परिवाराला कन्यारत्न प्राप्त झाले.
एका मुलीचा बाप झाल्याचा अभिमान आहे..
म्हणतात की देव मुलगी त्यालाच देतो,
जो तिला श्वासा प्रमाणे जपतो.
आज आमच्या परिवाराची खरी दिवाळी…
मला मुलगी झाली…
नऊ महिन्यापासून वाट पाहत होतो,
अखेर तो दिवस आला.
परमेश्वराने मला एक सुदंर गिफ्ट दिलं..
आज खऱ्या अर्थाने
संसाराचे एक वर्तुळ पुर्ण झालं.
आयुष्यातील सर्वश्रेष्ठ आनंदा पैकी एक आहे.
रंगबेरंगी इंध्रधनुष्य,
विधात्याने निर्माण केलेली अमूल्य अशी ठेव..
आई – वडिलांना अभिमान वाटावा अशी परी,
कन्यारत्नाचा झालाय लाभ..
डोळ्यात जिच्या स्वप्न अपरंपार,
अशी परी आली आहे..
जी करेल सुखांनी युक्त घरदार..
इवल्याशा पावलांनी सजवी घरदार,
अमूल्य अशी परी आली आहे माझ्या पदरात..
आई होणार समजलं जेव्हा,
बाप म्हणूनही केली होती प्रार्थना..
जन्म तुझाच व्हावा म्हणून केला होता धावा,
अशाच परीचा जन्म झाला..
आम्ही दोघंही
स्वागत करत आहोत एका छोट्याशा परीचं..
तुमच्या आशिर्वादाचीही आहे तिला गरज..
तिच्या येण्याने गजबजलं आहे घर,
तिच्या येण्याने झालं आहे संपूर्ण आमचं जग..
ज्या क्षणाची आतुरतेने पाहत होतो वाट,
घेऊन आली आहे परी तिचा वेगळाच थाट..
पहिला आवाज ऐकल्यानंतरच झाले मी वेडी,
पाडली जिने आई वडिलांना भुरळ,
अशी परी आली आहे दारी..
स्वर्गातील एक लहानसा तुकडा,
देवाने पाठवला आहे माझ्या घरी..
आली आहे जीवनात आमच्या
छोटीशी गोंडस परी..
कोण म्हणतं चमत्कार होत नाही,
आमच्या हातात नऊ महिन्यानंतर
झाला आहे एक चमत्कार..
लहानशा पिटुकल्या पावलानी
लक्ष्मी आली पदरी…
तिला पाहिलं आणि
सर्व काही हरखून जायला झालं..
सुख नक्की कशाला म्हणतात,
हे तिच्या जन्म झाल्यावर कळलं..
दोघंही होतो आनंदी
पण तिच्या येण्याने
आनंदाचा खरा अर्थ कळला आहे..
आज आमचं आयुष्य झालं आहे पूर्ण..
घरात झालं आहे परीचं आगमन..
इवल्याशा पावलांनी जी घरदार सजवी,
लक्ष्मीच्या पावलांनी येऊन घरात समृद्धी रुजवी…
अशा परीचे येणे प्रत्येक घरात व्हावे,
जिच्या येण्याने आयुष्य सुंदर होऊन जावे..!
कधीपासून तुझ्या येण्याची तयारी होती सुरू,
अखेर तो क्षण झाला आहे रूजू..
आम्ही झालो आहोत आई – वडील
घरात आली आहे एक गोड परी..
माझ्या हृदयावर राज्य करणारी
अशी गोड परी आली आहे जन्माला..
झालो आई – बाप आता
आली आहे सुखाची चादर वाट्याला..
तीच माझी साखर,
तीच माझं तिखट..
तिच्यामुळेच आयुष्यात आलाय गोडवा,
अशी माझी गोंडस मूरत..
इवल्याशा पावलांना पाहून
गेले मन भारावून..
आई वडील होण्याचा आनंद आहे खास,
याचीच होती आम्हाला इतके वर्ष आस..
Its Baby Girl
या जगात येऊन मला खूपच आनंद होतोय.
मी जन्म घेतला आहे आणि त्यामुळेच
घरात सगळीकडे आनंद पसरला आहे..
माझं नाव आहे…..