Haldi Kunku Invitation Marathi Messages

हळदी कुंकू
मकर संक्रांती पासून रथसप्तमी पर्यंत चालणारा सुहासिनी स्त्रियांचा आनंदाचा, नटण्या, मुरडण्याचा सण,पण त्यात कळत न कळतपणे नवरा गेलेल्या, लग्न न झालेल्या स्त्रीला डावललं जातं. स्त्रीच्याच सणात स्त्रीचा अपमान होतो. असं न करता त्यांना ही बोलवून त्याचंही आदरातिथ्य करा. भलेही त्यांना हळदी कुंकू नका देवू पण वाण किंव्हा गिफ्ट तर देऊच शकता..
तिळगुळ देऊन दोन गोड शब्द तर बोलूच शकता..
तिळगुळ घ्या गोड बोला..

Haldi Kunku Invitation Marathi Messages 6 -

पूर्वजांनी केले सण अन,
समारंभांचे आयोजन,
स्त्रियांना वेळ मिळावा,
यासाठी हे सारे नियोजन,
सूर्याचा होतो मकरराशीत प्रवेश,
अन होतो उत्तरायनाला प्रारंभ,
या दिवसापासून सुरु करतात हळदी कुंकू,
अन रथसप्तमीला करतात शेवट…!”
वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा,
आणखीन घट्ट करू…
मनातील जळमटें दूर करून,
कायमची झटकून टाकू..!
आरोग्याची गुरुकिल्ली, असे योग करण्यात
स्वतःसाठी वेळ काढून, स्वतःला सशक्त करण्यात
आम्ही साऱ्या मैत्रिणी, मिळूनी योग करू..
संक्रांतीचे हळदी-कुंकू, नव्याने साजरे करू…!
याच आहेत…..संक्रांतीच्या शुभेच्छा…!
तिळगुळ घ्या अन गोड गोड बोला..


साजरे करु मकर संक्रमण,
करुन संकटावर मात.
हास्याचे पालवे फुटुन,
तिळगुळांची करु खैरात…
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!
आमचे येथे दि. …. रोजी साय॑काळी .. वाजता
हळदी कुंकू आयोजिले आहे.
अगत्याचे येणे करावे हे आग्रहाचे निमंत्रण…

ADVERTISEMENT विज्ञापन
Haldi Kunku Invitation Marathi Messages 7 -

हास्याचे हलवे , तीळ गुळाची खैरात
लुटून वाण, साजरा करू सण उत्साहात
रथसप्तमीच्या या शुभ मुहूर्तावर
आमच्या घरी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले आहे.
आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवावी..

Haldi Kunku Invitation Marathi Messages 8 -

विसरुनी सारी कटुता,
नात्यात तीळगुळाचा गोडवा यावा..
एकमेकांच्या साथीने हा आनंदाचा सोहळा रंगावा..
दिनांक.. रोजी एकत्र भेटून
हळदी कुंकू करण्याचे योजिले आहे.
याकरिता आग्रहाचे आमंत्रण…

ADVERTISEMENT विज्ञापन
Haldi Kunku Invitation Marathi Messages 2 -

लेडीज अँड लेडीज
एकदा किटी पार्टी पेक्षा
हळदी कुंकू समारंभात भेटूू..
काय मग येताय ना?

Haldi Kunku Invitation Marathi Messages 4 -

चला सयांनो संस्कृती जपू..
रथसप्तमीच्या मुहूर्तावर आयोजित
हळदी कुंकू कार्यक्रमासाठी
आमच्या घरी अगत्याने येणे करावे..

Haldi Kunku Invitation Marathi Messages 3 -

मकर संक्रांतीचा सण गोडवा जपण्याचा,
ऋणानुबंध वाढवण्याचा
मग नववर्षातील या पहिल्या सणानिमित्त
सार्‍या एकत्र येऊन
साजरा करू सोहळा खास हळदी कुंकवाचा..

ADVERTISEMENT विज्ञापन

Haldi Kunku Invitation Marathi Messages 1 -


हळदी कुंकवाचा सारा घाट,
सुवासिनींचा आवडीचा थाट,
कालच झाला घरी झगमगाट,
सौभाग्याची मांगल्य मय वाट..

Haldi Kunku Invitation Marathi Messages 5 -


ती हळदी कुंकू करते,
सौभाग्य जपण्यासाठी !
ती देवीची ओटी भरते,
मातृत्व जपण्यासाठी !
ती घट बसवते,
प्रपंचाच्या स्थैर्यासाठी..
ती हरतालिका पूजते,
सुखी संसारासाठी !
ती वड पूजते,
पती प्रेमासाठी..
कोणतं व्रत करते,ती स्वतःसाठी ?
मग तरीही तिची थट्टा कशासाठी.?
पुरुष करतो का एखादी पूजा, व्रत,
उपास आपल्या बायकोसाठी ?
आयुष्यभर केवळ कुटुंबाकरिता
जगणाऱ्या प्रत्येक स्त्रीला मानाचा मुजरा..🙏🙏