जय मल्हारची पुन्हा वादळी हाक पाहिजे,
वीर मर्द धनगरांचा थवा पाहिजे,
पुन्हा एकदा या विश्वाला इंदोरची राणी
अहिल्यादेवी होळकर पाहिजे..
डोक्यावर पदर ढळला नाही ज्यांच्या,
राहिल्या पती निधनानंतर खंबीर ज्या..
डोळ्यात दिसे सात्विकतेचा भाव ज्यांच्या,
धन्य अहिल्याबाई होळकर त्या..
वीरांगणा, उदार ती राज्यकर्ती नार होती,
रामराज्य निर्मीती अहिल्यादेवी थोर होती.
स्त्रीशत्रू संस्कृतीची तिच्यामुळे हार होती,
पुरुष प्रधान उन्मादावर तीच खरी ‘वार’ होती..
भारतभर पसरली कीर्ती जिची,
तीर्थक्षेत्री बांधल्या धर्मशाळा,
उदार कारुण्यमूर्ती अहिल्या,
रयतेस लावला तिने लळा..!
ना सत्तेसाठी,ना राजकारणासाठी,
ना स्वार्थासाठी,ना प्रसिद्धीसाठी,
जीव फक्त तडपतो अस्मितेसाठी,
मी मी म्हणणारे त्यांना मातीत
लोळवणारी महाराष्ट्राची माती हाय,
खंजीरही घुसणार नाय
अशी या धनगराची छाती हाय..!
अहिल्यादेवींचे वंशज आम्ही,
कमजोर आम्हाला समजू नका.
चिंध्या चिंध्या करून टाकू,
नाद आमचा करू नका..!
लावतो जेव्हा पिवळा टिळा माथ्यावर,
घेतो जेव्हा पिवळा खांद्यावर,
गर्व वाटतो आम्हाला जय अहिल्या म्हटल्यावर,
त्यावेळी दुश्मनही म्हणतो,
काय शान असते ना,धनगर असल्यावर.
धक्का देणे शक्य नाही,
कोणा अहिल्यादेवींच्या ख्यातीला,
धनगरांशिवाय पर्याय नाही,
महाराष्ट्राच्या मातीला..
उरी बाळगूनी स्वप्न मराठी सत्तेचे,
बांधुनी तोरण हजारो गड किल्ले, मंदिरांचे,
घडविले जिने नव्या हिंदोस्तानाला,
एकच होती ती राणी अहिल्यादेवी होळकर..
राण्या असंख्य झाल्या या जगात,
पण पुण्यश्लोक कोणीही नाही,
गर्व जिचा आहे या मराठी हृृदयाला,
एकच ती महाराणी अहिल्यादेवी होळकरच झाली..
ना सत्तेसाठी, ना राजकारणासाठी,
ना स्वार्थासाठी, ना प्रसिद्धीसाठी,
जीव फक्त तडपतो अस्मितेसाठी,
मी मी म्हणणारे त्यांना मातीत
लोळवणारी महाराष्ट्राची माती हाय,
खंजीरही घुसणार नाय
अशी या धनगराची छाती हाय..
पुरे झाले आता आमच्यावरती हल्ले,
बुरुजा सकट जागे करू महाराष्ट्रातील किल्ले,
पाठीवर आमच्या राणी अहिल्येचा हात हाय,
मोडेल पण वाकणार नाय ही,
धनगराची जात हाय..
राणी आमुची अहिल्या,
जात आमुची धनगर,
कराल आमुचा घात,
तर पाठीत घालू लाथ,
ध्यानात ठेवा सर्वांनी,
हाय तुमची धनगरांशी गाठ,
गर्व आहे मला मी धनगर असल्याचा..
जर कोणी चुकत असेल
तर त्याला सत्याची वाट दाखवा,
अन जर कोणी नडत असेल
तर त्याला धनगराची जात दाखवा..
कर्म धनगर, श्वास धनगर,
जात धनगर, बात धनगर,
आस धनगर, ध्यास धनगर,
मी धनगर, आम्ही धनगर,
जय धनगर, जयस्तो धनगर,
धनगर, धनगर आणि फक्त धनगर..
स्वातंत्र्य रक्षिण्या अपुले,
ही वीर रणरागिनी झाली।
ही गोरगरिबांची मायमाऊली,
थोर अहिल्या जन्मा आली।
मनगटात ताकत तयांच्या
तलवारीत आग होती।
इंग्रजांनाही दाद न देण्याची
जिद्दच त्यांची न्यारी होती,
राणी असूनही वेगळी जिची छाप होती,
अशी राणी अहिल्याबाई होती।
मधुर होती जिची वानी,
अशी जन्मली तत्वज्ञानी राणी.
गाजवल्या जिने दिशा-दाही,
तिच्या उत्तुंग कार्याला खरच सीमा नाही.
सुखात नांदली आमची जनता,
कारण उत्तम शासक,
तत्वज्ञानी राणी होती,
राजमाता अहिल्याबाई होळकर..
घाट, मंदिरे विहिरी बांधल्या,
समान तिला रंक नि राव,
लोकांसाठी देह झिजवी,
अहिल्याबाई होळकर तिचे नााव..
पुरुष जातीचा बडगा छेदून,
केलीत तुम्हीं समाजसेवा..!
भुकेल्या पोटी घास देऊनी,
तृप्त केले तहानल्या जीवा..!
जात-धर्म विसरुन दाखवला,
मानव सेवेचा मार्ग नवा..!
अहिल्यादेवी होळकर आपल्या कार्याचा
निरंतर तेवत राहील दिवा..!
अभिमान वाटावा स्त्रीजातीला,
नारी म्हणून जन्म घेतला.
कर्तुत्ववान अहिल्याचा वारसा लाभला,
कळू द्या उभ्या जगाला.
कोण म्हणतो स्त्रियांना,
उघडावी तयाची झापडे.
कल्पना चे उड्डाण तिच्या
विश्व नवीन सापडे..
होळकरांची सुन होती बहुगुणी,
शिक्षणाची ओढे होती लहानपणी.
गरज ओळखुनी सुखावले सर्व जनी,
अशी जाहली दूरदृष्टी एक मर्दानी..!
प्रथम स्त्री सेनानी तू,
न्यायप्रिय तत्त्वज्ञानी राणी,
सर्वश्रुत धनुर्धर तू,
धर्मरक्षक स्त्री उद्धारक क्षत्राणि..
कुशल संघटक तू,
लोकमाता पुण्यश्लोक अहिल्या महाराणी,
कर्मयोगिनी स्त्री तू,
झळके इतिहासाच्या पानी..!